Join us  

मिठागरांच्या जमिनींवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करा; काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:11 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई : मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने महाराष्ट्र सरकारने तो त्वरित रद्द करावा अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणावर परिणाम होणार असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी देवरा यांनी केली आहे.सीआरझेड कायद्याअंतर्गत मुंबईतील मिठागरांच्या जमिनीची गणना पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये केली जाते. मिठागरांच्या जमिनींचा वापर जरी नैसर्गिक वायू आणि मीठ तयार करण्यासाठी होत असला तरी या जमिनी ना बांधकाम क्षेत्रामध्ये येतात. असे असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने मिठागरांच्या जमिनींवर बांधकाम करण्यास परवानगी दिली. हे देशाच्या आर्थिक राजधानीच्या पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याचा दावा देवरा यांनी केला.जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा जगातील सर्वात प्रदूषित महानगरांमध्ये मुंबईची गणना केली आहे. महाराष्ट्र सरकार या जमिनींवर बांधकाम करण्यास परवानगी देते हे अत्यंत दुदैर्वी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. देवरा पुढे म्हणाले, जर महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाप्रमाणे दहा लाख घरे मिठागरांच्या जमिनीवर बांधण्यात आली, तर आता जे मुंबईकर राहतात त्यांना मिळणाऱ्या नागरी सुविधांवर आणि त्यांच्या राहणीमानावर परिणाम होईल. रेल्वे, कचरा व्यवस्थापन यांसारख्या गोष्टींवर त्यांचा अधिक भार पडेल.पावसाळ्यामध्ये साचणाºया पाण्याचा समुद्रात विसर्ग करणे सुद्धा कठीण होऊन बसेल. यावरून आपल्याला हे कळते की मिठागरांची जमीन ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भौगोलिकदृष्ट्या किती महत्वाची आहे. म्हणून आमची महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे की, मिठागरांच्या जमिनीवर परवडणाºया घरांचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, अशी माहिती देवरा यांनी दिली.