Join us  

मागविला मोबाइल, मिळाली साबणाची वडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:31 AM

दहावीत मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, म्हणून वडिलांनी मुलीसाठी आॅनलाइन मोबाइल मागविला.

मुंबई : दहावीत मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, म्हणून वडिलांनी मुलीसाठी आॅनलाइन मोबाइल मागविला. मुलगी मोबाइलच्या प्रतीक्षेत असताना, मोबाइलऐवजी तिला साबणाची वडी मिळाल्याची घटना शिवडीत उघडकीस आली. या प्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिवडी परिसरात राहणारे सिराज खान यांच्यासोबत ही फसवणूक झाली आहे. त्यांचा तेथेच व्यवसाय आहे. त्यांच्या मुलीला दहावीत ८५ टक्के गुण मिळाले. अशात तिने वडिलांकडे मोबाइलसाठी हट्ट धरला. वडिलांनी तिच्यासाठी आॅनलाइन १६ हजार ७०० रुपयांचा मोबाइल मागविला. बुधवारी ठरल्याप्रमाणे मोबाइल आला. मात्र, मोबाइलच्या बॉक्समध्ये चक्क साबणाची वडी मिळून आल्याने त्यांना धक्काच बसला आणि मुलीच्या आनंदावर विरजणच पडले. खान यांनी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, तर सबंधित कंपनीकडेही त्यांनी तक्रार दिली आहे. कंपनीकडूनमोबाइलचे पैसे मिळणार असल्याचे समजते.

टॅग्स :धोकेबाजी