केबल, नेटवर्क, वाय-फायची बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 06:34 PM2020-10-15T18:34:45+5:302020-10-15T18:36:23+5:30

Network issues : मोबाईलचे नेटवर्क जाणे, वाय-फाय मध्येच बंद पडणे आणि टिव्ही केबलमध्ये सातत्याने अडथळे.

Cables, networks, Wi-Fi lights | केबल, नेटवर्क, वाय-फायची बत्ती गुल

केबल, नेटवर्क, वाय-फायची बत्ती गुल

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी झालेल्या वीज पुरवठा खंडीत प्रकरणानंतर अद्यापही नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: मोबाईलचे नेटवर्क जाणे, वाय-फाय मध्येच बंद पडणे आणि टिव्ही केबलमध्ये सातत्याने अडथळे येणे; असे अनेक मनस्ताप नागरिकांना होत आहे. विशेषत: मोबाईल नेटवर्कमध्ये सातत्याने अडथळे येत असल्याने नागरिकांच्या संवादात अडथळे येत आहेत.

कळवा-पडघा येथील तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला. वीज पुरवठा सुरळीत होण्यास सोमवारचे सात वाजले होते. संपुर्ण दिवसभर मुंबईत अडथळे निर्माण होत असतानाच दुपारी तीन ते चार सुमारे तासभर मोबाईलला नेटवर्क नव्हते. मोबाईलला तासाभराने नेटवर्क आले. सोमवारीच ही समस्या होती, असे नाही. तर मंगळवारीदेखील बहुतांशी केबल नेटवर्क बंद होते. उपनगरात तर बहुतांश ठिकाणी दुपारी केबल नेटवर्क बंद होते. परिणामी टिव्ही बंद होता. यात भर म्हणून की काय केबल नेटवर्कहून असलेले वाय-फायदेखील या काळात कित्येक वेळा बंद पडत होते. मोबाईल नेटवर्कचा विचार करता अधेमधे यातही अडथळे कायम होते. बुधवारी केबल आणि वाय-फायची अडचण नसली तरी सायंकाळसह रात्री सुरु  झालेल्या पावसामुळे मोबाईल नेटवर्कमध्ये मोठया प्रमाणावर अडथळे निर्माण झाले.

गुरुवारी दुपारी एक सव्वा वाजण्याच्या सुमारास केबल नेटवर्क  बंद होते. केबल नेटवर्क बंद असल्याने साहजिक वाय-फायला अडथळे आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरु होते. नेमक याच वेळी वाय-फाय बंद पडल्याने ऑनलाईन क्लासमध्ये अडथळे आले. पर्याय म्हणून अनेकांनी मोबाईल नेटवर्कच्या हॉटस्पॉटवरून वाय-फाय सुरु केले. मात्र मुळातच मोबाईल नेटवर्कचे तीन तेरा वाजल्याने कनेक्ट झालेले वाय-फायदेखील धीम्या गतीने सुरु होते. त्यामुळे ऑनलाईन क्लाससह उर्वरित सुरु असलेल्या व्यवहारांत अडथळे येत होते. दरम्यान, केबल नेटवर्क आणि वाय-फायमध्ये अडथळे येत असतानाच बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी मोबाईल नेटवर्कमध्ये आलेल्या अडचणींमुळे संवादात अडचण येत होती.

दरम्यान, मोबाईल नेटवर्क मध्ये येत असलेल्या अडथळ्यांबाबत मुंबईत सेवा देणा-या एका नामांकित कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येत असल्याचे मान्य केले; मात्र हा अडथळा मुंबईत नाही तर पुण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेटवर्कमध्ये अडथळा आल्याचे कंपनीने सांगितले. परंतु मुंबईत नेटवर्क व्यवस्थित सुरु होते. येथे नेटवर्कमध्ये काही अडचण नव्हती, असे स्पष्ट केले.
 

Web Title: Cables, networks, Wi-Fi lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.