Join us  

दिवाळीनिमित्त खरेदी :कॉलर टाइटच, कॅज्युअल्सना वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:34 AM

दिवाळीनिमित्त खरेदी वाढलेली आहे. कपड्यांच्या खरेदीसाठी लोक कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दादर बाजार, लालबाग मार्केट, मशीद येथील मंगलदास मार्केट गर्दीने तुडुंब भरले आहे.

अक्षय चोरगे मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदी वाढलेली आहे. कपड्यांच्या खरेदीसाठी लोक कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दादर बाजार, लालबाग मार्केट, मशीद येथील मंगलदास मार्केट गर्दीने तुडुंब भरले आहे. कपड्यांच्या किमती स्थिर असल्याने कपडे खरेदी सध्या जोमात सुरू आहे. कपड्यांमध्ये शटर््सला वेगळे महत्त्व आहे. सणासुदीचे दिवस असल्याने फॉर्मलपेक्षा कॅज्युअल्सनाच मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. चांगल्या दर्जाचे शर्ट ३५० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत दुकानांसह मॉल्समध्ये उपलब्ध आहेत.शर्ट्सच्या विविध ब्रँड्समध्ये ली कूपर, रँग्लर, टॉमी हिलफिगर, पीटर इंग्लंड, लेव्हीस, इंडियन टेरेन या ब्रँड्सच्या शटर््सला मोठी मागणी आहे. या ब्रँडच्या शटर््सच्या किमती महाग आहेत. परंतु दिवाळीनिमित्त विविध दुकानांमध्ये व मॉल्समध्ये आॅफर्समुळे हे शर्ट ८०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. लोकल कंपन्यांचे शर्ट्सही ३५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. हे शर्ट मोठ्या बँ्रडना बाजारांमध्ये टक्कर देत आहेत.कॅज्युअल शटर््समध्ये चेक शर्ट आणि प्रिंटेड शटर््सना मोठी मागणी आहे-१कॅज्युअल शटर््समध्ये चेक शर्ट आणि प्रिंटेड शटर््सना मोठी मागणी आहे. कॅज्युअल शटर््समध्ये विविधता असल्यामुळे आणि कॅज्युअल शर्ट जीन्ससह कोणत्याही पँटवर शोभून दिसत असल्याने कॅज्युललाच मागणी जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.२कॅज्युअल शटर््सला जास्त मागणी असली तरी फॉर्मलची मागणीसुद्धा कमी झालेली नाही. ज्या लोकांना फॉर्मल शर्ट आवडतात, असे लोक सणासुदीच्या काळातही फॉर्मल्स घालायला पसंत करतात. त्यामुळे फॉर्मल शटर््सलाही मागणी आहे.३फॉर्मल घालणारे रेडीमेड शटर््सपेक्षा कापड विकत घेऊन टेलरकडून शर्ट शिवून घेणे पसंत करतात. त्यामुळे मंगलदास मार्केटही सध्या तेजीत असल्याचे तेथील विक्रेत्यांनी सांगितले. १२० रुपये प्रतिमीटरपासून ते थेट १ हजार ५०० रुपये प्रतिमीटरपर्यंतच्या किमतीचे शटर््सचे कापड मंगलदास मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

टॅग्स :दिवाळीमुंबई