Join us  

बॅनरबाज खाणार जेलची हवा! पालिका कारवाईसाठी आक्रमक : फौजदारी गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 2:43 AM

मुंबईत सुरू असलेल्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. अशा जाहिरातबाजीविरुद्ध पालिकेने केलेल्या तक्रारीची दखल स्थानिक पोलीस ठाणे घेत नव्हते.

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. अशा जाहिरातबाजीविरुद्ध पालिकेने केलेल्या तक्रारीची दखल स्थानिक पोलीस ठाणे घेत नव्हते. त्यामुळे अनधिकृत बॅनर लावणाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०१४ मध्ये मुंबईतील सर्व राजकीय बॅनर हटविण्यात आले होते. त्यानंतर, पालिकेने राजकीय बॅनरबाजीवर पूर्णत: बंदी घातली. त्या काळात जाहिरातबाजीला आळा बसला होता. मात्र, पुन्हा मुंबईत राजकीय बॅनरयुद्ध सुरू झाले आहे. यामुळे मुंबईचा चेहरा मात्र विद्रूप होत आहे. अशा राजकीय बॅनरवर कारवाई करून, संबंधितांची पोलीस ठाण्यात पत्राद्वारे तक्रार करण्यात येत असे, परंतु या तक्रारीची दखल घेऊन एफआयआर दाखल करण्यात येत नव्हती. परिणामी, मुंबईच्या नाक्या-नाक्यांवर बॅनरबाजी सुरूच राहिली.* जेलची हवा खावी लागणारया प्रकरणी उच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना दंड करीत त्यांची कानउघाडणी केली होती. तरीही राजकीय पक्षांची जाहिरातबाजीची हौस काही फिटत नसल्याने, पालिकेने कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. त्यानुसार, शुभेच्छांचे फलक लावणाºयांना पालिका जेलची हवा खायला लावणार आहे. अशा प्रकारची जाहिरातबाजी ही एक प्रकारे पालिकेच्या नियमांचे उल्लंघन असल्याने, पालिकेच्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांना संबंधितांवर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका