Join us  

दुर्घटनेतील जखमींची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:59 AM

घाटकोपर येथील सिद्धिसाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.

मुंबई : घाटकोपर येथील सिद्धिसाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.मंगळवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७वर तर जखमींची एकूण संख्या १४वर पोहोचली आहे. जखमींपैकी सात जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. तर राजावाडी रुग्णालयात तीन व शांतिनिकेतन रुग्णालयात चार जखमी दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात पोलीस सिद्धिसाई इमारतीच्या वास्तुविशारदचा तसेच संबंधित ठेकेदाराचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरील महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पार्क साईट पोलिसांनी दिली.