Join us  

एमटीएनएलपाठोपाठ बीएसएनएलचे वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:53 AM

वर्षभरातील तिसरी वेळ; कर्मचाऱ्यांची निदर्शने

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या कर्मचाऱ्यांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन थकल्याने या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. वेतनाच्या मागणीसाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनने मंगळवारी मुंबईसह राज्यभरात व दिल्लीमध्ये निदर्शने करून याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर व बीएसएनएलच्या विभागीय कार्यालयाबाहेर कर्मचारी व अधिकाºयांनी निदर्शने केली. या वर्षात वेतन थकल्याचा प्रकार तिसºयांदा घडल्याने कर्मचारी संतप्त आहेत. सरकारने त्वरित या प्रकाराची दखल घेत वेतनासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी संघटनेचे परिमंडळ सचिव नागेशकुमार नलावडे यांनी केली. बीएसएनएलला कर्ज देण्यासाठी सरकार दुर्लक्ष करत असून सरकार व दूरसंचार विभागाचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा कर्मचाºयांचा आरोप आहे.

बीएसईयूचे सरचिटणीस पी. अभिमन्यू यांनी यासंदर्भात बीएसएनएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांशी संवाद साधला. मात्र त्यांनी वेतन कधी होणार याबाबत निश्चित माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. सरकार बीएसएनएलला वाचवण्याऐवजी खासगी कंपन्यांसाठी सोयीची भूमिका घेऊन खासगी कंपन्यांना धार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. भारताने जगातील ६३ देशांना १ लाख ९६ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र बीएसएनएलला कर्ज देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप पी. अभिमन्यू यांनी केला आहे. सरकारने बीएसएनएलसाठी तात्पुरते कर्ज देऊन बीएसएनएलला आर्थिक संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी संघटनेच्या वतीने केली. मुंबईतील निदर्शनांमध्ये भालचंद्र माने, महेश अरकल, गणेश हिंगे, यशवंत केकरे व कर्मचारी उपस्थित होते.एमटीएनएलचे वेतन उशिराने होत असून आता बीएसएनएलचे वेतनही रखडू लागल्याने सरकारला नेमके दूरसंचार विभागाचे करायचे तरी काय आहे, असा प्रश्न कर्मचाºयांकडून उपस्थित केला जात आहे. एमटीएनएलचे जुलै व आॅगस्ट महिन्याचे वेतन अद्याप झालेले नसल्याने एमटीएनएल कर्मचाºयांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.मात्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास अद्याप वेळ मिळाला नसल्याचा आरोप करत कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :मुंबईबीएसएनएल