मानलं भावा तुला... जिगरबाज भाजीविक्रेत्याचा फोटो रोहित पवारांनाही भावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:37 PM2020-05-27T18:37:01+5:302020-05-27T18:38:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन एका भाजीविक्रेत्याचा फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनाही या भाजीविक्रेत्याच्या जिगरबाज वृत्तीच कौतुक वाटतंय.

a brother ... Rohit Pawar also liked the photo of a greasy vegetable seller MMG | मानलं भावा तुला... जिगरबाज भाजीविक्रेत्याचा फोटो रोहित पवारांनाही भावला

मानलं भावा तुला... जिगरबाज भाजीविक्रेत्याचा फोटो रोहित पवारांनाही भावला

googlenewsNext

मुंबई - कोरोना महामारीत अन् लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडलंय. गरिबांपासून ते अगदी भिकारी असलेल्या व्यक्तींनीही आपलं दातृत्व दाखवून दिलंय. कुणी भुकेल्यांची भूक भागवलीय तर, अनेकांनी आपल्या क्षमतेनुसार मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री सहायता निधीत पैसे जमा केले आहेत. अनेकांनी अन्नछत्र सुरु करुन माणूसकी जपलीय. तर काहींनी आपल्या घासातील घास दुसऱ्याला भरवून मानवतेचा धर्म निभावलाय. श्रमिक अन् मजूरांच्या मदतीच्या कित्येक कथा लॉकडाऊन काळात आदर्श बनल्या आहेत. सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला एक फोटोही असाच आदर्शव्रत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन एका भाजीविक्रेत्याचा फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनाही या भाजीविक्रेत्याच्या जिगरबाज वृत्तीच कौतुक वाटतंय. कारण, या भाजीविक्रेत्याने त्याच्या गाडीवर लिहिलेला दोन ओळींचा संदेश माणूसकीचं दर्शन घडवणारा आहे. गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विविध कॅप्शन देऊन हा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा नेमका कुठला फोटो आहे, तो भाजीवाला कुठं राहतो, याबद्दल काहीही माहिती नाही. 

 
रोहित पवार यांनी हा फोटो शेअर करताना, हा फोटो औरंगाबाद येथील असल्याचे समजते, असे म्हटले आहे. ''व्हाट्सएपवर आलेला हा फोटो मी पाहिला. हा तरुण औरंगाबादचा असल्याचं कळतंय. पण त्याने लिहिलेला संदेश हा महत्त्वाचा आणि माणुसकीचा दाखला देणारा आहे. मानलं भावा तुला!'', असे ट्विट रोहित पवार यांनी लिहिलं आहे. भाजीविक्रेत्याच्या दिलदारपणाचं, भावा असं संबोधून रोहित यांनी तितक्याच दिलदारपणे कौतुकही केलंय. 

Web Title: a brother ... Rohit Pawar also liked the photo of a greasy vegetable seller MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.