Join us  

मीटर अद्ययावत करण्यासाठी दलाल आकारतात अतिरिक्त २५० रुपये; चालकांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 2:34 AM

मीटरमध्ये नवीन दर दिसण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे, मीटर पासिंग करणे या प्रक्रियेसाठी परिवहन आयुक्तालयाकडून ७०० रुपयांचा दर निश्चित केलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिक्षा - टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करण्यासाठी ७०० रुपये निश्चित केले आहेत. मात्र, दलालांकडून २५० रुपये अतिरिक्त घेण्यात येत आहेत. आरटीओकडून कारवाई न झाल्याने ८०० हून अधिक चालकांनी घाटकोपर पुलाजवळ रास्ता रोको केला.

मीटरमध्ये नवीन दर दिसण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे, मीटर पासिंग करणे या प्रक्रियेसाठी परिवहन आयुक्तालयाकडून ७०० रुपयांचा दर निश्चित केलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात ७०० अधिक २५० रुपये दलालांकडून आकारण्यात येत आहेत. रिक्षा मीटर पासिंग करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात झाली. गुरुवार-शुक्रवार मध्यरात्रीपासून घाटकोपर पुलाखाली  रांग लावण्यात आली. सुमारे ८०० चालक या वेळी उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी २०-३० मीटरची पासिंग झाल्यानंतर मीटर पासिंग बंद करून आरटीओमधून सही-शिक्का आणल्यानंतर मीटर पासिंग करण्यात येईल, असे चालकांना सांगितले आहे.

चालक आणि प्रवाशांमध्येभाडे आकारणीवरून वादमीटर अद्ययावत होईपर्यंत प्रवाशांकडून अद्ययावत भाडे आकारण्यासाठी परिवहन विभागाने नव्या भाडेदराचा तक्ताही प्रकाशित केला आहे. मात्र, डिजिटल मीटर असताना कागदी तक्ता पाहून जादा भाडे देण्यास प्रवाशांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे शहरात टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्ये भाडे आकारणीवरून वाद होत आहेत. त्यासाठी हा तोडगा काढण्यात आला आहे.‘आरटीओ अधिकारी, दलाल  हातमिळवणीमुळे कारवाई नाही’वडाळा आरटीओमध्ये रिक्षा-टॅक्सीच्या मीटर पासिंगसाठी दलालांकडून २५० रुपये अतिरिक्त घेण्यात येत असल्याची तक्रार आरटीओ अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकारी आणि दलालांच्या हातमिळवणीमुळे यांच्यावर कारवाई झालेली नाही. अखेर रिक्षाचालकांनीच वसुली करणाऱ्या दलालांना पकडून पोलिसांकडे सोपवले, असे रिक्षा-टॅक्सी संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले.