भर पावसात मालाडमध्ये घरे तोडली, पोलिसांकडून रहिवाशांना अमानुषपणे मारहाण: भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 04:02 PM2021-07-17T16:02:21+5:302021-07-17T16:43:21+5:30

Atul Bhatkhalkar: भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांना अटक. मराठी माणसाच्या नावावर पक्षाचे दुकान चालवणाऱ्यांनी मराठी माणसालाच उद्ध्वस्त केले आहे. कुरार मेट्रो स्टेशनचे नोव्हेंबरमध्ये उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाची घाई झालेली असल्यामुळे ‘कोणत्याही परीस्थितीत ही वस्ती हटवा’, असे आदेश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना  देण्यात आले होते असा आरोप भातखळकर यांनी केला.

broke houses in Malad, police strip residents naked and beat them inhumanely; Atul Bhatkhalkar allegations | भर पावसात मालाडमध्ये घरे तोडली, पोलिसांकडून रहिवाशांना अमानुषपणे मारहाण: भातखळकर

भर पावसात मालाडमध्ये घरे तोडली, पोलिसांकडून रहिवाशांना अमानुषपणे मारहाण: भातखळकर

Next

मुंबई-  कुरार मेट्रोमध्ये बाधित होणाऱ्या मालाड पूर्वेकडील रहिवाश्यांच्या घरांवर तुघलकी कारवाई करत एमएमआरडीएने पोलिस बळाचा वापर करत भर पावसात बुलडोजर फिरवला. विरोध करणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला. यावेळी आमदार भातखळकर यांना अटक करण्यात आली.  (Atul Bhatkhalkar arrested in Malad.)

मराठी माणसाच्या नावावर पक्षाचे दुकान चालवणाऱ्यांनी मराठी माणसालाच उद्ध्वस्त केले आहे. कुरार मेट्रो स्टेशनचे नोव्हेंबरमध्ये उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाची घाई झालेली असल्यामुळे ‘कोणत्याही परीस्थितीत ही वस्ती हटवा’, असे आदेश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना  देण्यात आले होते असा आरोप त्यांनी केला.

गिरगाव पॅटर्ननुसार आहे त्या ठिकाणी घरांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी इथे आंदोलनही केले. परंतु ठाकरे सरकारने या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गोरेगाव पश्चिमेतील एका इमारतीत स्थलांतरीत होण्यासाठी एमएमआडीएचा दबाव सुरू होता. या इमारतीत अलिकडेच स्लॅबपडून एकाचा मृत्यू झाला असल्याने इथे जाण्यास रहिवाशांचा विरोध होता. पाचव्या मजल्यावर जागा दिल्यामुळे दुकानदारही संतप्त होते. रहिवाशी ऐकत नसल्याचे बघून ठाकरे सरकारने दहशतीचा बडगा उगारला. काल रात्री १२ वाजता रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आणि सकाळीच पोलिसांच्या ताफ्यासह इथे बुलडोजर मागवून कारवाई सुरू करण्यात आली. विरोध करणाऱ्या महिलांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांना गाड्यांमध्ये कोंबून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून आमदार अतुल भातखळकर यांना जोरजबरदस्तीने अटक करून आरे पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पावसात घरे तोडू नये, असा मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देश आहे. परंतू कायदा धाब्यावर बसवून घरावर बुलडोजर घालण्यात आले. गिरगाव पॅटर्न प्रमाणे पुनर्वसन करा, ही मागणी करणे हा काय गुन्हा आहे काय? रहिवासी घरे सोडायला तयार होते, आमचे स्थानिक ठिकाणीच पुनर्वसन व्हावे व पावसात घरे तोडू नका व  एवढीच त्यांची विनंती होती. परंतु आपला अहंकार जपण्यासाठी ठाकरे सरकारने बहुसंख्य मराठी वस्ती असलेल्या मालाडमधील घरांवर मोगलही लाजले असते, अशा पद्धतीने कारवाई केली अशी टीका सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली.

ठाकरे सरकारच्या या दंडेलशाहीविरुद्ध आम्ही संघर्ष आणखी तीव्र करणार असून सोमवारी न्यायालयात दाद मागणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Web Title: broke houses in Malad, police strip residents naked and beat them inhumanely; Atul Bhatkhalkar allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.