Join us  

थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून २७ जानेवारी ...

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवर भारतीय शेतीविषयक आपले विचार व्यक्त करतील तसेच मार्गदर्शनदेखील करतील, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भाषा संचालनालयातर्फे २१ जानेवारी रोजी ‘मराठी भाषा व भाषांतरांतील अंतरे’ या विषयावर डॉ. चिन्मय धारुरकर यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन झूम चॅनलच्या माध्यमातून, थेट प्रक्षेपित होणार आहे, तर २२ जानेवारी रोजी ‘मराठी भाषेतील अनुवादाची समृद्धी’ या विषयावर उमा कुलकर्णी व वीरुपाक्ष कुलकर्णी, पुणे यांची मुलाखत श्यामसुंदर हे घेणार आहेत. हा कार्यक्रम लघुप्रेक्षागृह, पु.ल. देशपांडे अकादमी, प्रभादेवी इथे होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम भाषा संचालनालयाच्या यू-ट्यूब वाहिनीवर सकाळी ११ वाजता पाहता येणार आहे.