Join us  

बॉम्बे हॉस्पिटल लेन दुतर्फा होणार, रुग्णांना मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:40 AM

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ‘बॉम्बे हॉस्पिटल’ मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ‘बॉम्बे हॉस्पिटल’ मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुग्णालयालगतच्या सर्व रस्त्यांवर एकेरी वाहतूक असल्याने अनेकवेळा रुग्ण व रुग्णवाहिकांना चर्चगेटपर्यंत वळसा घालून यावे लागत होते. आता या रस्त्याचे रुंदीकरण करून हा मार्ग दुतर्फा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण व वाहनचालकांची गैरसोयही दूर होणार आहे.मरिन लाइन्स येथे बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टमार्फत बॉम्बे हॉस्पिटल चालविण्यात येत आहे. मुंबईतीलच नव्हेतर, देशाच्या कानाकोपºयातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. हे रुग्णालय विठ्ठलदास ठाकरसी मार्ग म्हणजे पूर्वीचे अमेरिकन सेंटर असणारा मार्ग व बॉम्बे हॉस्पिटल लेन या दोन रस्त्यांवर आहे. मात्र या दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक असल्यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांना व रुग्णवाहिकांना चर्चगेटपर्यंत फेरा घालून रुग्णालयात यावे लागत असे. याची दखल घेऊन अखेर महापालिका प्रशासनाने बॉम्बे हॉस्पिटल लेनचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.बॉम्बे हॉस्पिटल लेन या २०१ मीटर लांबीच्या रुंदीकरणाची ‘रस्ता रेषा’ सन १९६७मध्ये आखण्यात आली होती. ज्यामुळे १२.३० मीटर (४० फूट) रुंदीच्या या रस्त्याची रुंदी २१.३४ मीटर (७० फूट)पर्यंत वाढविणे शक्य आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकदेखील बांधण्यात येणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या महिन्यात पूर्ण होऊन रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक सुरू होईल, अशी माहिती साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे हटविलेया रस्त्याच्या एका बाजूला असणारी व रुंदीकरणाच्या आड येऊ शकणाºया विहिरीवरदेखील ‘स्लॅब’ टाकून ती झाकण्यात येणार आहे. विहिरीतून पाणी घेता यावे, यासाठी विहिरीच्या एका बाजूला झाकण असणार आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या आड येऊ शकणारी सहा दुकाने यापूर्वीच हलविण्यात आली आहेत.असा वाचणाररुग्णांचा त्रासया रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरू झाल्यानंतर ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ चौकातून (मेट्रो चौक) महात्मा गांधी मार्गावरून उजवे वळण घेऊन ‘बॉम्बे हॉस्पिटल लेन’ या मार्गाने थेट ‘बॉम्बे हॉस्पिटल’मध्ये येणे शक्य होणार आहे. ज्यामुळे रुग्णवाहिकांचा चर्चगेटपर्यंतचा फेरा वाचणार आहे.