मुंबई: बोर्डिंग पास मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाइलद्वारे ‘पेपरलेस’ बोर्डिंग पास मिळणार आहे. ही योजना मुंबई टी-2 टर्मिनलहून नवी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि गोवा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध होईल. ‘विस्तारा’च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून किंवा अॅप्लिकेशनद्वारे ही सेवा प्रवाशांना वापरता येईल. बोर्डिंग पास सेवेसाठी संकेतस्थळ अथवा अॅपवर ‘पीएनआर’ची नोंदणी करावी. प्रवासासंदर्भातील इतर माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमातून लिंक मिळते. त्यावर क्लिक करावे, त्यानंतर स्क्रीनवर आलेल्या पासचा स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह केल्यानंतर मोबाइलवर बोर्डिंग पास उपलब्ध होणार आहे.
मोबाइलद्वारे बोर्डिंग पास!
By admin | Updated: August 3, 2015 02:04 IST