मुंबई महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, मिलिंद सोमणसारखा असावा; काँग्रेसचा 'सोशल' विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:51 AM2021-08-24T09:51:06+5:302021-08-24T10:08:22+5:30

मुंबई काँग्रेसने आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

BMC mayoral candidate should be like Riteish Deshmukh, Milind Soman: Mumbai Congress | मुंबई महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, मिलिंद सोमणसारखा असावा; काँग्रेसचा 'सोशल' विचार

मुंबई महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, मिलिंद सोमणसारखा असावा; काँग्रेसचा 'सोशल' विचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई काँग्रेसने आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या धोरण समितीच्या अहवालावरून तसे संकेत मिळत आहेत. या समितीने निवडणुकीसंबंधी अहवाल सादर केला असून, त्यात महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्यासारखा म्हणजेच सामाजिक पार्श्वभूमीचा असावा, अशी शिफारस केली आहे. शिवाय संबंधित व्यक्तीचे नाव निवडणुकीपूर्वी घोषित करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

काँग्रेसने पालिका निवडणुकीपूर्व चाचपणीसाठी विविध समित्या बनविल्या आहेत. त्यापैकी धोरण समितीचे सचिव गणेश यादव यांनी नुकताच अहवाल सादर केला. यात निवडणूक रणनीती कशी असावी, याबाबत सूचना करण्यात आली आहे. महापौरपदाचा उमेदवार निवडताना विशेष काळजी घ्यावी. संबंधित व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीचा नसावी. त्याऐवजी सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्त्वाला संधी द्यावी. युवकांसह सर्व समाजघटकांना मान्य असेल, मतदारांशी नाळ जोडलेली असेल, अशा व्यक्तीला प्राधान्य देण्यात यावे, असे या अहवालात म्हटले आहे. 

असे करा तिकीट वाटप
तिकीट वाटप करताना काही प्रमाणात युवा चेहऱ्यांना संधी मिळेल, याची काळजी घ्या. सामाजिक कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क असलेल्या नवउद्योजकांचाही विचार करावा, जेणेकरून प्रतिमा सुधारली जाईल, अशी शिफारसही धोरण समितीच्या अहवालात करण्यात आली आहे.
 

Web Title: BMC mayoral candidate should be like Riteish Deshmukh, Milind Soman: Mumbai Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.