Join us  

पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:06 AM

मुंबई : पश्चिम रेल्वे मजदूर संघाच्या वतीने नुकतेच रक्तदान महादान अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात पश्चिम ...

मुंबई : पश्चिम रेल्वे मजदूर संघाच्या वतीने नुकतेच रक्तदान महादान अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी स्वतः रक्तदान केले. रक्तदान अभियानाचे उद्घाटन करताना आलोक कंसल यांनी स्वतः रक्तदान करून रेल्वे कर्मचाऱ्यांपुढे आदर्श उभा केला आहे.

यावेळी पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांच्या अध्यक्षांशिवाय पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात मुंबई विभागातून ४३२ युनिट रक्त गोळा करण्यात आले आहे.

यावेळी कंसल म्हणाले की, मी कित्येकवेळा रक्तदान केले आहे. पश्चिम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण आणखी अशी कामे पुढे नेणार आहोत. रुग्णालय आणि समाजसेवी संस्थेच्या मदतीसाठी असे अभियान राबविण्यास पश्चिम रेल्वेला आनंद होईल. गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्यास रेल्वे कर्मचारी कधीही तयार आहेत. त्यांनी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाची सवय करा असे आवाहन केले.