Join us  

‘रंगसंगती’चे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेली ११ वर्षे समाज प्रबोधनात्मक नाट्याविष्कारांचे सादरीकरण करून वर्धापनदिन साजरा करणाऱ्या रंगसंगती कला मंच, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेली ११ वर्षे समाज प्रबोधनात्मक नाट्याविष्कारांचे सादरीकरण करून वर्धापनदिन साजरा करणाऱ्या रंगसंगती कला मंच, मुंबई या संस्थेने यंदाच्या वर्धापनदिनी काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा सामाजिक उपक्रम पार पाडण्यास संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनीही यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले आहे.

रविवार, १६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, ६ वा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, परळ येथे आयोजित या शिबिरासाठी वेळेच्या नियोजनासाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या दिवशी प्रवास करण्यासाठी इच्छुकांना हॉस्पिटलकडून पत्रक देण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी संस्थेने ८६५२५१९६६७ व ९६६४१२१९८७ हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------