Join us  

आज तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक; सीएसएमटी ते नेरूळ विशेष ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 2:32 AM

पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक असेल.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दोन्ही मार्गांवर सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणेदरम्यान सकाळी ११.०२ ते सायंकाळी ४.२६ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान दोन्ही मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. तर मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येईल.हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दोन्ही मार्गांवर सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ११.०६ ते सायंकाळी ४.३० पर्यंत पनवेल/बेलापूर ते सीएसएमटी मार्गावरील लोकल व सकाळी १०.०३ ते दुपारी ३.३९ पर्यंत सीएसएमटटी- पनवेल/बेलापूरला सुटणाºया डाऊन मार्गावरील लोकल रद्द केल्या आहेत.ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणेदरम्यान सकाळी ११.०२ ते सायंकाळी ४.२६ पर्यंत ब्लॉक असेल. सकाळी ११.१४ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठाणे ते पनवेल मार्गावरील डाऊन ट्रान्सहार्बर सेवा बंद राहील. ब्लॉक काळात पनवेल ते अंधेरी एकही लोकल धावणार नाही.सीएसएमटी ते नेरूळ/वाशी विशेष ट्रेनपनवेल ते नेरूळ दरम्यान असलेल्या ब्लॉकमुळे या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नेरूळ/वाशी मार्गावर विशेष गाड्या सोडल्या जातील. ब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई लोकल