Join us  

नोटाबंदीने भ्रष्टाचाराचे काळे दिवस संपविले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:23 AM

काळा पैसा रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेत हीच भूमिका पुढे नेली.

मुंबई : काळा पैसा रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेत हीच भूमिका पुढे नेली. या निर्णयाने काँग्रेसच्या काळ्या भ्रष्टाचाराचे काळे दिवस संपविले, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हाणला.नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अभिनंदनासाठी आरपीआयने दादर येथील चैत्यभूमीजवळ सभेचे आयोजन केले होते. ढोल वाजवत आणि पेढे वाटून नोटाबंदीचे यश यावेळी साजरे करण्यात आले. याप्रसंगी आठवले म्हणाले की, नोटाबंदीच्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. नोटाबंदीमुळे काळ्या पैश्यावाल्यांचे, भ्रष्टाचा-यांचे धाबे दणाणले. काळा पैसा बाहेर आला. नोटबंदी वेळी देशभरातील सामान्य जनतेने केंद्र सरकारलाजे सहकार्य केले ती मोठी देशसेवा होती, असेही आठवले म्हणाले. नोटबंदीचा वर्धापन दिन काँग्रेसकाळा दिवस म्हणून पाळत आहे. काँग्रेसच्या सत्ता काळात अनेक भ्रष्टाचार झाले. गरिबी हटविण्याच्या केवळ पोकळ घोषणा झाल्या. काँग्रेसने गरिबांच्या पुढ्यात काळे दिवस वाढले होते. नोटाबंदीने त्यांना लगाम लागला आहे, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.

टॅग्स :रामदास आठवले