Join us  

बीकेसी ते ठाणे दहा मिनिटांत, २५० रुपये तिकीट

By महेश चेमटे | Published: February 19, 2018 4:22 AM

मुंबई : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे तीन टप्प्यांतील दर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते ठाणे या बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. हा प्रवास अवघ्या १० मिनिटांचा असेल, असा दावा नॅशनल हाय रेल स्पीड कॉर्पोरेशनने (एनएचआरसीएल) केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प १५ आॅगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी राज्याच्या ठाणे शहरासह पालघर, डहाणू येथे भूसंपादनाच्या कामाबाबतची बोलणी सुरू आहेत. हे काम सुरू असतानाच मुंबईतील तीन प्रवासी टप्प्यांतील बुलेट ट्रेनचे अंदाजित दर एनएचआरसीएलने जाहीर केले आहेत. यात बीकेसी ते ठाणे, बीकेसी ते विरार आणि बीकेसी ते बोईसर या टप्प्यांसाठी अनुक्रमे २५०, ५०० आणि ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर सध्याच्या विविध वाहतुकीच्या किमतीवरून ठरवण्यात आले आहेत. बीकेसी ते ठाणे हा प्रवास १० मिनिटांत, बीकेसी ते विरार हा प्रवास २४ मिनिटांत आणि बीकेसी ते बोईसर हा प्रवास ३९ मिनिटांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती एनएचआरसीएलचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी दिली.

बीकेसी ते ठाणे रस्त्याने जाण्यासाठी एक तास लागतो. तर बीकेसी ते विरार-बोईसरसाठी अनुक्रमे २ तास आणि पावणेतीन तासांचा कालावधी लागतो. परिणामी बुलेट ट्रेनमुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होईल.मार्च-एप्रिलमध्ये भूसंपादनमुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मार्च-एप्रिलमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या आम्ही संपर्कात आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन अधिग्रहणासाठी सनदी अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. दोन महिन्यांत या प्रकल्पामुळे किती स्थानिक बाधित झाले आहेत, याची माहिती समोर येईल, असे एनएचसीएलच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :बुलेट ट्रेन