“संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ, जातात तिथे सत्ता जाते”; भाजपचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:23 PM2021-09-29T14:23:55+5:302021-09-29T14:25:47+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

bjp nitesh rane criticised shiv sena sanjay raut and congress navjot singh sidhu | “संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ, जातात तिथे सत्ता जाते”; भाजपचा प्रहार

“संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ, जातात तिथे सत्ता जाते”; भाजपचा प्रहार

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्यात एकीकडे शिवसेनेचे काही नेते ईडीच्या रडारवर असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका करत ते जुळे भाऊ असून, जातात तिथे सत्ता जाते, असा टोला लगावला आहे. (bjp nitesh rane criticised shiv sena sanjay raut and congress navjot singh sidhu)

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, उपनगर तसेच ठाणे, कल्याण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. तसेच खड्ड्यांबाबत होत असलेली बैठक म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू हे जुळे भाऊ

संजय राऊत जिथे जातात तिथे भाजपची सत्ता येते. संजय राऊत आणि नवज्योत सिंग सिद्धू जुळे भाऊ आहेत. एकीकडे सिद्धू काँग्रेसला संपवत आहेत, तर संजय राऊत शिवसेनेला बुडवणार, या शब्दांत नितेश राणे यांनी घणाघात केला आहे. दुसरीकडे, मुंबईतील खड्ड्यांना शिवसेनाच जबाबदार आहे. गेल्या ३२ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. मुंबई महापालिकेचे बजेट प्रचंड आहे. असे असले तरी मुंबईतील खड्ड्यांबाबत आतापर्यंत काहीही ठोस करण्यात आल्याचे पाहायला मिळत नाही. स्टॅडिंगमध्ये अंडस्टॅडिंग होते. काळ्या यादीत असलेल्यांनाही कंत्राटे मिळतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंमत करून कलानगर, मातोश्रीच्या जवळ असलेल्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार का, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. ते टीव्ही९ शी बोलत होते. 

दरम्यान, नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये मुंबईकरांनो, आपल्या व्यथा मांडा. आपल्या हक्कासाठी लढा. आम्ही होऊ तुमचे माध्यम. विचारू तुमचा टॅक्सचा पैसा खड्डात घालणाऱ्यांना जाब. खड्ड्यांचे फोटो आणि व्हीडीओ आम्हाला वॅाट्सअप करा.- 9321812290, असे सांगत मुंबईकरांना आवाहन केले आहे. 

Web Title: bjp nitesh rane criticised shiv sena sanjay raut and congress navjot singh sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.