हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 09:50 AM2020-01-24T09:50:51+5:302020-01-24T10:04:51+5:30

मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.

BJP leader Chandrakant Patil has welcomed the MNS for taking up the role of Hindutva | हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत पण...; भाजपा, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांची 'ही' अट

Next

मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे. मनसेच्या या बदलच्या भूमिकेवरुन भाजपा आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र येत युती करु शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील मनसेचे स्वागत केले आहे. 

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपाला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला हवी. मनसेने परप्रांतियांबाबत असणारी भूमिका बदलली तर भाजपा मनसे एकत्र येऊ शकतात, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 

...म्हणून मनसेचा झेंडा बदलला; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा  

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेने विचारधारा बदलल्यास एकत्र येऊ असे विधान केले होते. तसेच महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर मग आम्ही सत्यासाठी सोबत का येऊ शकत नाही असा सवाल देखील सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

इंजिनाची दिशा बदलणार?; सुधीर मुनगंटीवारांकडून भाजपा-मनसे युतीचे संकेत

मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही. असे म्हणत राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन'' असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: BJP leader Chandrakant Patil has welcomed the MNS for taking up the role of Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.