"तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख?"; टिपू सुलतानवरून भाजपा आमदाराचं ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:06 AM2022-01-28T10:06:47+5:302022-01-28T10:34:32+5:30

BJP Ameet Satam And Uddhav Thackeray : अमित साटम यांनी टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

BJP Ameet Bhaskar Satam letter to Uddhav Thackeray Over Tipu Sultan | "तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख?"; टिपू सुलतानवरून भाजपा आमदाराचं ठाकरेंना पत्र

"तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख?"; टिपू सुलतानवरून भाजपा आमदाराचं ठाकरेंना पत्र

googlenewsNext

मुंबई - मालाड येथे क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद रंगला आहे. भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले. त्यातच भाजपानेही टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम (BJP Ameet Bhaskar Satam) यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. यानंतर आता अमित साटम यांनी टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

"मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थिती होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच समस्त हिंदूतर्फे तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या महापौर किशोरीताई पेडणेकर एका बाजुला जाहीर करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. दुसऱ्या बाजुला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटी बनावटी दस्ताऐवज वापताहेत. वास्तविक जर टिपू सुलतान नामफलक अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यतच त्या मग्न आहेत."

"पालकमंत्री राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करताहेत"

"धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व इतर कामांसाठी फेर फार क्रमांक ९०३ प्रमाणे महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालकमंत्री मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करून क्रिडांगण बांधताहेत. म्हणजे अवैध वापर करताहेत. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरीता गैरवापर करताहेत. आपणास नम्र विनंती आहे की यावर आपण त्वरीत मुख्य सचिवाद्वारे सदर बाबीची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारास दंडीत करावे ही विनंती" असं अमित साटम यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

महापौर, अस्लम शेखविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

अमित साटम यांनी याआधी पत्रात म्हटलंय की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी महापालिकेच्या सभेत एका रस्त्याला टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिले होते. परंतु असा कुठलाही फॉर्मेट मुंबई महापालिकेचा नाही. व्हायरल झालेले पत्र हे नव्याने तयार करण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला. त्याचसोबत अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मंत्री अस्लम शेख आणि मुंबई महापालिकेचे चिटणीस यांच्याविरोधात ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.

 

Web Title: BJP Ameet Bhaskar Satam letter to Uddhav Thackeray Over Tipu Sultan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.