Join us

मुंबईत पक्षी उद्यान साकारा-उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 27, 2015 02:17 IST

महापालिकेने मुंबई शहरासह उपनगरांत देखणी आणि मोकळा श्वास घेण्याची संधी देणारी उद्याने साकारली आहेत. या उद्यानांत आलेला

मुंबई : महापालिकेने मुंबई शहरासह उपनगरांत देखणी आणि मोकळा श्वास घेण्याची संधी देणारी उद्याने साकारली आहेत. या उद्यानांत आलेला मुंबईकर निसर्गाशी एकरुप होत वेळ व्यतीत करत असून, आता मुंबईतील वातावरणात समरस होणाऱ्या चिमण्या, बुलबुल पक्ष्यांकरिता महापालिकेने ‘पक्षी उद्यान’ देखील साकारावे, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.कुर्ला पूर्वेकडील सह्याद्री दुर्ग आणि वनस्पती उद्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी खुले करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. यापूर्वी उद्यानाच्या जागी कचरा टाकला जात होता. महापालिकेने या जागेचे महत्त्व ओळखत आणि जनतेची आवश्यकता लक्षात घेत येथे आकर्षक उद्यान साकारले. या उद्यानात सहयाद्रीतील दुर्गांची प्रतिकृता साकारण्यात आली आहे. शिवाय सहयाद्री पर्वतराजींतील वनस्पतीच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. शिवनेरी, पुरंदर, कुलाबा या शिवकालीन दुर्गांच्या प्रतिकृती उद्यानात साकारण्यात आल्या आहेत. सुमारे ६.५ एकर जागेत हे उद्यान साकारण्यात आले आहे. (प्रतिनिधी)