Join us

सलमानला मोठा दिलासा

By admin | Updated: January 23, 2015 02:05 IST

सलमान खानच्या जे़जे़ रुग्णालयात झालेल्या रक्त चाचणीत मद्य आढळले नसल्याची साक्ष येथील डॉक्टर शशिकांत पवार यांनी गुरुवारी सत्र न्यायालयात दिली़

मुंबई: वांद्रे येथे हिट अ‍ॅण्ड रन केल्यावर अभिनेता सलमान खानच्या जे़जे़ रुग्णालयात झालेल्या रक्त चाचणीत मद्य आढळले नसल्याची साक्ष येथील डॉक्टर शशिकांत पवार यांनी गुरुवारी सत्र न्यायालयात दिली़ त्यामुळे सलमानला दिलासा मिळाला असून, पुढील सुनावणी २७ जानेवारीला होणार आहे.अपघातानंतर सलमानला रक्त चाचणीसाठी रुग्णालयात आणले तेव्हा तो सर्वसामान्यांसारखा दिसत होता़ मद्यपान केले नसल्याचे सलमान म्हणत होता़ पण त्याच्याजवळ गेल्यावर मद्याचा वास येत होता़ रुग्णालयात त्याची रक्त चाचणी करण्यात आली़ या चाचणीत मद्य आढळले नाही़ त्यानंतर रक्ताचे नमुने फॉरेंसिक लॅबमध्ये चाचणीसाठी दोन नमुने पाठवण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.