Join us  

बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाटा मोटर्सच्या २६ वातानुकूलित बसगाड्या शुक्रवारी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाटा मोटर्सच्या २६ वातानुकूलित बसगाड्या शुक्रवारी बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम २’ उपक्रमांतर्गत ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी २६ बसगाड्या शनिवारी बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या. नरिमन पॉइंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते.

सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिव्यांग प्रवाशांना चढण्या-उतरण्यात समस्या येऊ नये यासाठी इलेक्ट्रिक लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.