Behind the petition challenging the parking pen | पार्किंगच्या दंडाला आव्हान देणारी याचिका मागे
पार्किंगच्या दंडाला आव्हान देणारी याचिका मागे

मुंबई : मुंबई महापालिकेने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांकडून दंडाच्या स्वरूपात दहा हजार रुपये वसूल करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला मलबार हिल येथील एका सोसायटीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या सोसायटीने ही याचिका मागे घेतल्याचे बुधवारी न्यायालयाला सांगितले. चंद्रलोक-बी या सोसायटीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीदरम्यान सोसायटीच्या वकिलांनी सोसायटी ही याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, त्याचे कारण सांगितले नाही.


Web Title: Behind the petition challenging the parking pen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.