‘सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 03:24 AM2020-10-27T03:24:10+5:302020-10-27T03:24:41+5:30

Court News : जून मध्ये संचारबंदी असताना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ रहिवासी क्षेत्रात किराणा मालाचे दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकांदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दुकान बंद करण्याचे व मास्क घालण्यास सांगूनही त्यास नकार दिला.

'Beating a government employee is a serious crime' | ‘सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा’

‘सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा’

googlenewsNext

मुंबई : मास्क घालण्यास नकार देत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीची जामिनावर सुटका करण्यात उच्च न्यायालयाने नकार दिला. 

जून मध्ये संचारबंदी असताना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ रहिवासी क्षेत्रात किराणा मालाचे दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकांदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दुकान बंद करण्याचे व मास्क घालण्यास सांगूनही त्यास नकार दिला. तक्रारदार हे सरकारी कर्मचारी असून त्यांच्या म्हणण्यानुसार, दुकानदाराने त्यांचे म्हणणे ऐकण्याऐवजी त्यांनाच धक्काबुक्की केली आणि लाकडी काठीने मारहाण केली. आरोपीच्या वडिलांनीही तक्रारदाराला मारहाण केली आणि शिवीगाळ केली. मात्र, त्यांचे वय पाहून व गुन्ह्यातील सहभाग पाहून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. 

गुन्ह्याचे स्वरूप पाहता मुख्य आरोपी संरक्षण मिळवण्यास पात्र नाही, असे म्हणत न्या. एस. व्ही. कोतवाल यांनी मुख्य आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. तर न्यायालयाने आरोपीच्या वडिलांना २५ हजार रुपयांच्या बॉण्डवर सुटका करण्याचे निर्देश गोरेगाव पोलीस ठाण्याला दिले.मारहाण केली नाही.
जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्याने तर सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करताना पाहिले नाही. सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला. कर्तव्यावर असलेक्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, हे गंभीर आहे. अशा घटनांना आळा घातला पाहिजे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, त्यांचे वय पाहून व गुन्ह्यातील सहभाग पाहून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. 
 

Web Title: 'Beating a government employee is a serious crime'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.