Join us  

मुंबईकरांनो सावधान ! यंदाही १०० ठिकाणी तुंबणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 3:42 AM

पावसाळ्यात सखल भागांमध्ये तुंबणा-या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरात अनेक उपाययोजना केल्या. यामुळे गेल्या वर्षी पाणी तुंबलेल्या १५५पैकी ५५ ठिकाणी पावसाळ्यात जलद गतीने पाण्याचा निचरा होईल, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.

मुंबई : पावसाळ्यात सखल भागांमध्ये तुंबणा-या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरात अनेक उपाययोजना केल्या. यामुळे गेल्या वर्षी पाणी तुंबलेल्या १५५पैकी ५५ ठिकाणी पावसाळ्यात जलद गतीने पाण्याचा निचरा होईल, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. या दाव्याची शहानिशा करण्यासाठी आयुक्त अजय मेहता यंदाच्या पावसाळ्यात या ५५ ठिकाणांची पाहणी करणार आहेत.गेल्या वर्षी पावसाळ्यात १५५ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे आढळून आले होते. पाणी तुंबणाºया अशा ठिकाणांची यादी करून प्राधान्याने तिथे उपाययोजना करण्याची ताकीदच आयुक्तांनी सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांना केली होती. याबाबत पालिका मुख्यालयात शनिवारी झालेल्या मासिक बैठकीत आयुक्तांनी आढावा घेतला.विविध स्तरीय उपाययोजना राबविल्यामुळे येत्या पावसाळ्यात १५५पैकी ५५ ठिकाणी पाण्याचा अधिक जलदगतीने निचरा होईल, अशी हमी अधिकाºयांनी दिली. तरीही पाणी साचण्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा सहायक आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व संबंधित अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे आढावाघ्यावा, त्या ठिकाणी स्वत: पाहणी करावी, असे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले.आयुक्त घेणारकामांचा आढावापाणी साचण्याच्या ५५ ठिकाणी महापालिका आयुक्त स्वत: भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेणार आहेत. असे स्वत: आयुक्तांनीच जाहीर केल्यामुळे अधिकारी कामाला लागलेआहेत.अन्य ठिकाणी पंप : पाण्याचा अधिक जलद गतीने निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पंप बसविण्यात येतात. याबाबत सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील पंप बसविण्याच्या जागांची पाहणी करून आढावा घ्यावा. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित खात्याला कळवावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.झाडांच्या छाटणीवर विशेष नजरपावसाळ्यात मुंबईतील झाडे धोकादायक ठरत असतात. झाड पडून पादचारी मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. म्हणून खबरदारीसाठी पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी केली जाते.मात्र धोकादायक फांद्या अथवा झाडे तोडताना काही ठेकेदार अयोग्य पद्धतीने छाटणी करीत असतात. त्याचे नकारात्मक परिणाम झाडांच्या संतुलनावर व झाडांशी संबंधित इतर बाबींवर होत असल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते.त्यामुळे वृक्ष छाटणी करताना ती शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक पद्धतीनेच व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यास आयुक्तांनी बजावले आहे.

 

टॅग्स :मुंबई