भारतामध्ये मृत्यू होण्याचा पाच प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांत बदलेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसते आहे. हृदयाची काळजी घेतल्यास निरोगी आयुष्य मिळू शकते. 29 सप्टेंबर हा ‘जागतिक हृदयविकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘हृदयाला सांभाळा’ ही या वर्षाची संकल्पना आहे. या दिनाचे औचित्य साधून हृदयविकाराचे प्रमाण, त्याची कारणो, या क्षेत्रसमोरील नवीन आव्हाने कोणती याविषयी नायर रुग्णालयाच्या हृदयरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय चौरसिया यांच्याशी पूजा दामले यांनी केलेली ही बातचीत..
हृदयविकाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढते आहे का?
हृदयविकाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत चालले आहे. भारतामध्ये मृत्यूच्या पाच प्रमुख कारणांपैकी हृदयविकार हे एक प्रमुख कारण आहे. देशातील 2क् वर्षांवरील व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 3-4 टक्के तर शहरी भागात 8-1क् टक्के इतके आहे. म्हणजेच 196क् ते 2क्क्क् या कालावधीत ग्रामीण भागात हे प्रमाण
2 टक्क्यांनी तर शहरी भागात हे प्रमाण 6
टक्क्यांनी वाढलेले आहे. जगातील हृदयविकाराच्या रुग्णांपैकी 6क् टक्के रुग्ण हे भारतात आहेत.
मुंबईसह राज्यात हृदयविकार रुग्णांचे प्रमाण किती आहे?
एकूणच राज्याचा विचार केल्यास ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये हृदयविकारांच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या काही वर्षामध्ये मुंबईतील हृदयविकार रुग्णांचे प्रमाण 1क् ते 12 टक्क्यांनी वाढले आहे. तर हेच प्रमाण ग्रामीण भागात 4 ते 5 टक्के इतकेच आहे. याचाच अर्थ शहरी भागांमध्ये हृदयविराकाराचे प्रमाण हे दुप्पटीने वाढताना दिसत आहे.
हृदयविकार वाढण्यामागची प्रमुख कारणो काय?
हृदयविकार होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सध्याची जीवनशैली हे आहे. बहुतांशजण हे बैठी कामे करतात. शारीरिक हालचाल कमी झाली आहे. याचबरोबरीने धुम्रपानाच्या प्रमाणात वाढ होते आहे. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह असतो अशांनाही हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉलचे
जास्त प्रमाण, काही विशिष्ट कर्करोगांमध्ये छातीवर रेडिएशन थेरपी घ्यावी लागते,
यामुळेही हृदयविकाराचे धोका वाढतो.
हृदयविकार शस्त्रक्रियांसाठी येणारा खर्च कमी
होतो आहे, यामागची कारणो कोणती?
हृदयविकाराच्या उपचारांचा खर्च गेल्या काही वर्षात नक्कीच कमी होताना दिसत आहे. सामान्यपणो हृदयविकार असल्यास करण्यात येणा:या अॅन्जिऑप्लास्टी आणि कॉर्नरी बायपास सजर्री या प्रक्रियांचा खर्च गेल्या तीन वर्षापासून कमी होताना दिसत आहे. या दोन्ही प्रक्रियांसाठी येणारा खर्च हा 18 ते 44 टक्के कमी झालेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्टेण्टची कमी झालेली किंमत हे आहे.
हृदयविकार क्षेत्रतील आत्ताची मोठी आव्हाने कोणती आहेत?
वाढत्या आर्युमर्यादेबरोबर जगभरामध्ये हृदयविकार हा सगळ्यात मोठा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. 6क् वषार्ंखालील व्यक्तींना हृदयविकार जडण्याचे प्रमाण 2क्25 र्पयत दुप्पट आणि 2क्5क् र्पयत तिप्पट होणार आहे. यामुळे या क्षेत्रसमोरील आव्हाने वाढत जाणार आहेत. यामध्ये आरोग्य सेवेवर हृदयविकाराच्या रुग्णांचा भार वाढणार आहे, त्या तुलनेत तज्ज्ञ मंडळीची संख्या कमी असणार आहे. ग्रामीण भागात कमी असणा:या पायाभूत सुविधा. नवीन येणा:या उपयंत्रच्या वाढत्या किंमती ही मोठी आव्हाने पुढच्या काळात ङोलावी लागणार आहेत.