बांग्लादेशी इसम भाजपचा कार्यकर्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:36 AM2021-02-05T04:36:31+5:302021-02-05T05:40:38+5:30

  मुंबई : बांग्लादेशी इसमाला बुधवारी मालवणी पोलिसांनी अटक केली. रुबेल जोनू शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या ...

Bangladeshi BJP activist? | बांग्लादेशी इसम भाजपचा कार्यकर्ता?

बांग्लादेशी इसम भाजपचा कार्यकर्ता?

googlenewsNext

 मुंबई : बांग्लादेशी इसमाला बुधवारी मालवणी पोलिसांनी अटक केली. रुबेल जोनू शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

मालवणीच्या आंबोजवाडी परिसरात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी शेख याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा बांग्लादेशी नागरिक आहे. त्याने भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच भारतात भारत सरकारने विहित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त भारत व बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवास केला. तसेच वास्तव्यही केले म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करून पुन्हा त्याची रवानगी बांग्लादेश येथे करण्यात येणार आहे. शेख हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती असून यामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: Bangladeshi BJP activist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.