वांद्रे स्कायवॉक डिसेंबरपासून पादचाऱ्यांसाठी खुला करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 06:33 AM2019-09-15T06:33:45+5:302019-09-15T06:33:51+5:30

वांद्रे-कुर्ला स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरपासून खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

Bandra Skywalk will be open to pedestrians starting December | वांद्रे स्कायवॉक डिसेंबरपासून पादचाऱ्यांसाठी खुला करणार

वांद्रे स्कायवॉक डिसेंबरपासून पादचाऱ्यांसाठी खुला करणार

Next

मुंबई : वांद्रे-कुर्ला स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी ३१ डिसेंबरपासून खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्टिट्यूट (व्हीजेटीआय) १५ आॅक्टोबरपर्यंत पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करेल आणि १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करेल, असे महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
वास्तविक हा स्कायवॉक सुरक्षित आहे. मात्र, आॅडिट अहवाल येईपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येईल, असेही महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
काही महिन्यांपासून हा स्कायवॉक पादचाºयांंसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, ३१ डिसेंबरपासून पुन्हा हा स्कायवॉक पादचाºयांसाठी सुरू करण्यात येईल, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हा स्कायवॉक बंद ठेवल्याने पादचाºयांचे खूप हाल होत आहेत. या स्कायवॉकची सुरुवात वांद्रे स्टेशनला होते आणि शेवट कलानगरमध्ये होतो. वेस्टर्न एक्स्प्रेसवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला. मात्र, काही कारणास्तव एमएमआरडीएने हा स्कायवॉकचा वापर करणे बंद केले आहे.
एमएमआरडीएने स्कायवॉकच्या वापरास बंदी घातल्याने त्यांच्या या निर्णयाविरोधात तेथील रहिवासी केपीपी नायर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली
आहे.

Web Title: Bandra Skywalk will be open to pedestrians starting December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.