ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅग्मो) नेतृत्वाखाली आतापर्यंत झालेल्या सर्व आंदोलनांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांबरोबर मोठ्या संख्येने सहभागी होणारे ‘बीएएमएस’ डॉक्टर सध्या सुरू असलेल्या डॉक्टरांच्या असहकार आंदोलनातून बाहेर पडले आहेत. मॅग्मोच्या आंदोलनात बीएएमएस डॉक्टरांचे हित जपले नसल्याचा आरोप या डॉक्टरांकडून केला जात आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या असहकार आंदोलनातून बीएएमएस डॉक्टर बाहेर पडून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत राहणार आहेत. यासाठी या डॉक्टरांनी आज जिल्हा आरोग्य अधिकार्यांची भेट घेऊन पूर्ववत सहकार्याचे आश्वासन दिले. मात्र, सुमारे ११० एमबीबीएस डॉक्टरांचे असहकार आंदोलन सुरूच असून ते बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत़ (प्रतिनिधी)
बीएएमएस डॉक्टर आंदोलनातून बाहेर
By admin | Updated: May 30, 2014 00:09 IST