Join us  

‘लिटिल थिएटर’ने गाजविली बालरंगभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:09 AM

सुधा करमरकर यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाशी संबंधित होते. साहजिकच सुधातार्इंवर नाट्यकलेचे संस्कार बालपणापासूनच झाले.

मुंबई : सुधा करमरकर यांचे वडील तात्या आमोणकर हे गिरगावच्या मुंबई मराठी साहित्य संघाशी संबंधित होते. साहजिकच सुधातार्इंवर नाट्यकलेचे संस्कार बालपणापासूनच झाले. त्या वेळी त्यांना नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. पार्श्वनाथ आळतेकर यांच्या कला अकादमीत व पार्वतीकुमार यांच्या नृत्यशिबिरात त्यांचे शिक्षण झाले. भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकारातही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नाटकात त्यांना नृत्यकुशल अशा नायिकेची, म्हणजेच रंभाची भूमिका मिळाली आणि त्यांची कला खºया अर्थाने रसिकांसमोर आली.१९५९ मध्ये साहित्य संघाच्या सहकार्याने त्यांनी ‘मधुमंजिरी’ हे बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित हे बालनाट्य प्रचंड गाजले. सुधातार्इंनी रंगवलेली चेटकिणीची भूमिका ‘माईलस्टोन’ ठरला. पुढे परदेशी जाऊन त्यांनी बालरंगभूमीचा विशेष अभ्यास केला आणि तिथून परतल्यावर त्यांनी ‘लिटल थिएटर’ची स्थापना करून बालरंगभूमी चळवळ उभी केली. रंगभूमीवरील त्यांच्या मौलिक कार्याची दखल घेत‘झी मराठी’ वाहिनीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविले होते.पाया भक्कम केलाबालरंगभूमीच्या प्रणेत्या सुधाताई आम्हाला गुरुस्थानी होत्या. साठ वर्षांपूर्वी त्यांनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. बालरंगभूमीचा पाया मजबूत केला. त्यांनी केलेल्या बालनाट्यांनी मुलांवर गारुड केले होते. अनेक पिढ्यांपर्यंत त्यांची ही नाटके पोहोचली. आमच्या विशेष मुलांच्या नाट्य चळवळीविषयीसुद्धा त्यांना आस्था, कौतुक होते. आमच्या मुलांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, असे बालरंगभूमीच्या निर्मात्या-दिग्दर्शिका कांचन सोनटक्के म्हणाल्या.>शिक्षकांपर्यंत बालनाट्य नेलेसुधातार्इंनी व्यावसायिक रंगभूमीसह बालनाट्य चळवळीसाठी मोठे योगदान दिले. आमच्यासारख्या शाळेतल्या शिक्षकांपर्यंत त्यांनी बालनाट्य पोहोचविले. आम्हाला त्यांनी बालनाट्यासाठी लिहिते केले. त्यांनी लेखक व दिग्दर्शक घडविले. शाळेच्या मुलांचे नाटक करा, अशी शिकवण त्यांनी आम्हाला दिली. बालरंगभूमीवरची नाटके ‘हाऊसफुल्ल’ घेण्याएवढे कर्तृत्व त्यांनी बजावले.- विद्या पटवर्धन, ज्येष्ठ दिग्दर्शिका, बालरंगभूमीबालरंगभूमीचा एक अध्याय संपलाअभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या कार्यक्षेत्रात ठसा उमटविणाºया आणि मराठी बाल रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या विकासात मोलाचे योगदान देणाºया ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच्या निधनाने, बाल रंगभूमीचा एक अध्याय संपला आहे. त्यांच्याशिवाय बाल रंगभूमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. बालनाट्याला वाहिलेल्या ‘लिटिल थिएटर- बाल रंगभूमी’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून बालनाट्ये सादर केली. ‘मधुमंजिरी’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘चीनी बदाम’, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही त्यांनी सादर केलेली बालनाटके नेहमीच लक्षात राहतील. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री.