Join us  

आयुष मंत्रालयाचा ‘टेक्नोसॅव्ही’ योग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:53 AM

पाच हजार वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणारी योग विद्या ही देशाने जगाला दिलेली देणगी आहे.

मुंबई : पाच हजार वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणारी योग विद्या ही देशाने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक व आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. योग उपचारामुळे मनुष्याची शारिरीक व मानसिक प्रगती होण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने यंदाचा २१ जून हा योगा दिन ‘टेक्नोसॅव्ही’ पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.योग दिनापूर्वीच आयुष मंत्रालयाने सोशल मीडीयावर म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिष्ट्वटरवर बेसिक योगा पासून काही वैशिष्ट्यपूर्ण आसनांचे व्हीडीओज अपलोड केले. सामान्य नागरिक कुठल्याही कोपऱ्यातून हे व्हीडीओ बघून घरच्या घरी, आॅफिसमध्ये कुठेही योगा करुन शकतात. हे व्हीडीओज् डाऊनलोड करुन योगविषयक जनजागृती करण्याचे आवाहन आयुष मंत्रालयाने केले.