Join us  

वयोवृद्धांना गंडा घालणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:45 AM

प्रवास, अथवा शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या एकाकी वयोवृद्धांना गाठायचे.

मुंबई : प्रवास, अथवा शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या एकाकी वयोवृद्धांना गाठायचे. पोलीस असल्याची बतावणी करून पुढे हत्या झाली आहे, दागिने जपून वापरा, असे सांगत पिशवी आणि पर्समध्ये ते काढून ठेवण्याच्या नावाखाली चोरी करून पसार होणाºया एका ठगाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. राजेश साबाजी बापर्डेकर असे त्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष १ने ही कारवाई केली. त्याला १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बापर्डेकरविरुद्ध दादर, शिवाजी पार्क, कुर्ला, कांदिवली, मालवणी या पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षामध्ये तब्बल १० गुन्हे नोंद आहेत. वर्षभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर पडला होता. न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटसुद्धा जारी करण्यात आले आहे.वृद्धांना लुटणारा एक गुन्हेगार सेंट जॉर्ज परिसरात येणार असल्याची माहिती कक्ष १ला मिळाली. त्यानुसार, त्यांनी सापळा रचला. लुटीच्या प्रयत्नात असतानाच बापर्डेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

टॅग्स :अटक