Join us  

अथार खान अजूनही सेंट जॉर्ज रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 6:05 AM

हिमालय पूल दुर्घटनेला एक महिना झाला असला, तरी अजूनही या दुर्घटनेतील जखमी मोहमद अथार खान याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेला एक महिना झाला असला, तरी अजूनही या दुर्घटनेतील जखमी मोहमद अथार खान याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २८ वर्षीय अथारच्या दोन्ही पायांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, औषधोपचार सुरू आहेत. या घटनेला एक महिना होऊनही केवळ आचारसंहितेच्या कारणास्तव मदत मिळाली नसल्याने, दुर्घटनेतील अनेक पीडितांच्या कुटुंबीयांमध्ये कमालीची निराशा आहे.१४ मार्च या दिवशी संध्याकाळी सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल कोसळला. दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांसाठी पाच लाख, तर जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, अजूनही ही मदत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाही. महिना उलटल्यानंतर अथार या घटनेविषयी सांगतो की, घटना घडली, तेव्हा या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असणाऱ्या वडिलांसाठी डबा घेऊन येत होतो, त्याच वेळी दुर्घटना घडली आणि मी जखमी झालो. काही वेळ नेमके काय घडले आहे तेच कळले नाही. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ ओढावली. सर्व दिनक्रम विस्कळीत झाला.सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, या दुर्घनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३३ जण जखमी झाले होते. नंदा कदम यांच्या २७ दिवसांनी झालेल्या मृत्यूनंतर आता मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे.या दुर्घटनेतील जखमी असणाºया सुजय माझी यांना पाठीत दुखापत झाली आहे, ते सांगतात की, अनेकदा दुर्घटनेतील पीडितांवर अन्याय होतो, तसा तो आमच्याबाबतीतही झाला आहे. दुखापतीमुळे औषधोपचारांचा खर्च वाढला आहे. मात्र, घोषणा केलेली मदत आजमितीस कागदावरच आहे.>‘कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ’पूल दुर्घटनेतील जखमी मोहमद अथार खान याने सांगितले की, दुर्घटनेला महिना झाला, तरी अजूनही माझ्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरूच आहेत. आयुष्य थांबले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी आहे. मात्र, पायांच्या दुखण्यामुळे काही करू शकत नाही. शिवाय, सरकारी यंत्रणांकडून मदत मिळाली नसल्याने आर्थिक भारही आहे.