Join us  

‘१०८’चे ७ लाख रुग्णांना साहाय्य, मुंबईतील ३६ हजार रुग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:28 AM

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा चार वर्षांपूर्वी सुरू केली. ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत २० लाख ६४ हजार ७७२ रुग्णांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली.

- स्नेहा मोरेमुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा चार वर्षांपूर्वी सुरू केली. ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत २० लाख ६४ हजार ७७२ रुग्णांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. तर गेल्या वर्षभरात राज्यभरात ७ लाख ८२ हजार ४९१ रुग्णांना या रुग्णवाहिकेने नवजीवन दिले, यात मुंबईतील ३६ हजार ७२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून आले आहे.या तातडीच्या वैद्यकीय सेवा प्रकल्पात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची रुग्णसेवा देण्यात येते. या सेवेविषयी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (१०८) चे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले की, ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून ५ हजार तज्ज्ञांचा चमू रुग्णांच्या सेवेत असतो.(जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७)आपत्कालीन सेवेचे प्रकार रुग्णसंख्या (राज्य) रुग्णसंख्या (मुंबई)आकस्मिक अपघात ७३१२० १५४३हल्ला १०९८३ ३१७भाजणे ३८८६ १८१हृदयरुग्ण २१०७ ३१६पडणे २४६०६ ४0११विषबाधा ३०७८६ २६९प्रसूतीकळा/गर्भधारणा २२४०७० ४४७६वीज पडणे/शॉक लागणे ११५८ ३२दुर्घटना ३९०७ १३५अन्य १३२१२० २६९७पॉलीट्रामा १४२५ २१२आत्महत्या/स्वत: केलेली इजा ७५९ ६0एकूण ७८२४९१ ३६0७२

टॅग्स :हॉस्पिटल