Join us

वडाळ्यात वृद्ध वडिलांसह मुलावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

मुंबई : वडाळ्यात मंदिर बांधण्याच्या वादातून वृद्ध वडिलांसह त्यांंच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी ...

मुंबई : वडाळ्यात मंदिर बांधण्याच्या वादातून वृद्ध वडिलांसह त्यांंच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत, अधिक तपास सुरू केला आहे.

या हल्ल्यात दुराई तेवर (६१) आणि रमेश तेवर (३२) जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते सायन कोळीवाडा येथील म्हाडा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्यास आहेत. याच परिसरात मंदिर उभारण्याच्या वादातून गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी आणि त्यांच्यात वाद सुरू होते. याच वादातून सोमवारी रात्री ९ वाजता आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती लागताच, वडाळा टी टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. यात मेरी तेवर, अरुमुगम तेवर, मुरुगेन तेवर आणि आर्ले तेवर या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.