Join us  

‘आसिफा हम शरमिंदा हैं...!, भाजपाविरोधी टीकेची झोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:07 AM

‘आसिफा हम शरमिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं!’ अशा शब्दांत उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि काश्मीरमधील कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरणांचे पडसाद शुक्रवारी सोशल मीडियावर उमटले.

मुंबई : ‘आसिफा हम शरमिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं!’ अशा शब्दांत उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि काश्मीरमधील कठुआ येथील सामूहिक बलात्कार प्रकरणांचे पडसाद शुक्रवारी सोशल मीडियावर उमटले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील इंडिया गेटवर काढलेल्या कँडल मार्चनंतर मुंबईतील आझाद मैदानात शुक्रवारी डावे पक्ष आणि संघटनांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तर उघडपणे या घटनेचा निषेध नोंदवणाऱ्या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा संताप सोशल मीडियावर पाहायला मिळाला.या प्रकरणानंतर भाजपाने घेतलेल्या भूमिकेचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. सोशल मीडियावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलावंतांनीही निषेध नोंदवत, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यात अभिनेता फरहान अख्तर, रितेश देशमुख, अभिनेत्री रेणुका शहाणे, सोनम कपूर, कल्की कोचीन, सारा श्रवण यांचा समावेश आहे. मुंबई काँग्रेससह भाकप, माकप, सद्भावना संघ अशा विविध राजकीय पक्षांसह संस्था आणि संघटनांनी शुक्रवारी दुपारी आझाद मैदानात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.‘अशा घटना घडणार असतील, तर माझ्या पोटी मुलगी नको’ अशा तीव्र शब्दांत अभिनेत्री सारा श्रवण हिने या प्रकरणात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका चिमुकलीवर बलात्कार करतो, त्याला जगण्याचा कोणताही अधिकार असू नये. जो बलात्कार करतो, जो अशा कृत्याला मदत करतो, जो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, जो पैसे घेऊन गप्प बसतो, तो माणूस असूच शकत नाही. बलात्कार हा ‘तमाशा’ बनून राहता कामा नये. काही लोक बलात्काºयाला पाठीशी घालतात, ते पाहून मला आश्चर्य वाटते,अशा तीव्र भावना व्यक्त करत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी माणुसकीलाच श्रद्धांजली व्यक्त केली आहे.>सरकारने लक्ष घालावे - शरद पवारकठुआ बलात्कार प्रकरणावरही तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी या प्रकरणात सरकारने लक्ष घालण्याचे वक्तव्य केले आहे. पवार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये जे झाले, तो अस्वस्थ परिसर आहे. त्यात एवढे गंभीर प्रकरण बाहेर आल्यावर केंद्र सरकारने त्याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. सद्य परिस्थिती पाहता पीडित मुलीच्या कुटुंबीयांना, वकिलांना संरक्षण देण्याची गरजअसून या लोकांच्या जिवाला धोका नाकारता येत नाही, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :राधिका आपटे