ठाणो : नवरात्रतील महत्वाच्या अष्टमी, नवमी आणि दशमी या माळा जशा जवळ येत आहेत तसा फुलांचा बाजार पुन्हा एकदा कडाडू लागला आहे. त्यामुळे सर्व सामान्य भक्त आणि ग्राहकांची मात्र कोणती फुले आणि हार वापरावा अशी अवस्था होते आहे. नवरात्रच्या पूर्व संध्येस मंदावलेला फुलबाजार अचानक वाढलेल्या भयानक उकाडय़ाने सध्या अनेक पटीने वधारला आहे.
वास्तविक या वेळी फुलांचा बाजार कडाडण्याचे तसे कारण नव्हते परंतु, अचानक कडाक्याचे उन पडू लागल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पडणा:या पावसाचे जे पाणी जमिनीत खोलवर मुरले होते. त्याची वाफ झपाटय़ाने या उष्म्यामुळे बाहेर येऊ लागली. याचा परिणाम ठाणो, मुंबईत येणा:या फुलांच्या आवकीवर झाला. फुले ताजी रहावी म्हणून त्यावर पाणी मारले जाते, त्यांच्या पॅकिंगवर हिरवा पाला चढवून त्यावर जे बारदान बांधले जाते त्यावरही पाणी मारले जाते. परंतु उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि तो माल मोठय़ा प्रमाणात सडला. किंवा त्याची प्रत तरी घसरली. त्यामुळे मागणी आणि आवक याचा समतोल असतानाही निम्म्याहून अधिक माल वाया गेल्याने विक्रीयोग्य माल अर्धाच उपलब्ध झाला. त्याचा फटका बाजाराराला बसतो आहे. उकाडा कमी झाला तर ही परिस्थिती काहीशी बदलेल अन्यथा नवरात्र होईर्पयत फुलबाजाराची तेजी कायम चढती राहिल.
4ङोंडू जो 2क् ते 3क् रुपये किलो होता तो आता प्रतीनुसार 6क् ते 1क्क् रुपयांवर गेला आहे. मोग:याचा गजरा 3क् ते 4क् रुपयांना एक.
4वेणी तिच्या सजावटी आणि फुलांनुसार 3क् ते 6क् रुपयांर्पयत आहे. ती देखील मिळाली तर सकाळी 12 र्पयत मिळते. त्यानंतर ती बाजारात दिसत नाही. अशीच अवस्था हारांची आहे.
4छोटात छोटा आणि साध्यात साधा हार 3क् ते 4क् रुपये असा आहे. विशेष सजावटीच्या हारांच्या किमती तर विचारायलाच नको. हार बनवून ते विकल्यास जास्त कमाई असल्याने सुटे फुले मिळणो दुरापास्त झाले आहे.
4मोगरा एक हजार रुपये किलो झाला आहे. तर लीलीची गड्डी 1क्क् ते 15क् रुपयांना आहे. तिच अवस्था निशिगंधाची आहे.