Join us  

अशोक सावंत हत्या प्रकरण : ‘एमपीएससी’च्या लेक्चररने रचला हत्येचा कट, मास्टर माइंडसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:56 AM

समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यात या हत्येच्या मास्टर माइंडचा समावेश आहे. जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षांसाठीचा लेक्चरर आणि आरटीआय कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.

मुंबई : समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. यात या हत्येच्या मास्टर माइंडचा समावेश आहे. जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षांसाठीचा लेक्चरर आणि आरटीआय कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. या अटकेनंतर हत्येमागचा नेमका उद्देश समोर येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.विशाल गायकवाड आणि अनिल वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वाघमारे हा आरटीआय कार्यकर्ता, तसेच एमपीएससी लेक्चरर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने अनेकदा पोलीस ठाण्यात जाऊनही एमपीएससीचे लेक्चर्स घेतल्याची माहिती आहे. यातील गायकवाड हा कल्याण, पूर्व येथील तीसगाव परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, तर वाघमारेला भायखळ्यातून अटक करण्यात आली. सावंत यांच्या हत्येनंतर वाघमारे, गायकवाड, अल्पवयीन हल्लेखोर आणि जगदीश पाटील उर्फ जग्गा हे कल्याणला पसार झाले. त्यानंतर, अल्पवयीन हल्लेखोर पुण्याला गेला, तर उर्वरित अन्यत्र पसार झाले.सावंत यांच्यावर हल्ला करणाºयांपैकी वाघमारे हा एक आहे. त्यानेच सर्वांचे ‘ब्रेनवॉश’ करत, त्यांना सावंत यांच्या हत्येसाठी उकसवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी आता जग्गा फरार असून, त्याच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येईल, असे तपास अधिकाºयाचे म्हणणे आहे. सर्व अटक संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापही या हत्येचा नेमका हेतू पोलिसांना समजला नसून, त्याचा शोध सुरू आहे.अपमानाचा घेतला बदलाआरटीआय कार्यकर्ता असलेला वाघमारे अनधिकृत कामाची माहिती काढायचा. त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करुन पैसे काढायचा. याबाबत स्थानिक लोक सावंत यांच्याकडे त्याची तक्रार करायचे. त्यामुळे सावंत यांनी अनेकदा त्याला अपमानित केले होते. त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान व्हायचे.पण सावंत यांच्या बांधकाम प्रकल्पातही वाघमारे आणि अन्य संशयीत हे स्थानिक असूनही त्यांना काम दिले जात नव्हते. शिवाय सावंत याच्या सुरक्षारक्षकानेही वाघमारेच्या कानशीलात लगावली होती. त्याने याचा राग मनात धरला होता. यावर वाघमारेने अन्य पाच जणांना हाताशी धरुन अखेर सावंत यांचा काटा काढला, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :अटक