Join us  

अरुप पटनायक राजकारणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:47 AM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त; बिजू जनता दलात प्रवेश

भुवनेश्वर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलात प्रवेश केला. याआधी पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन डॉ. सत्यपाल सिंग भाजपात गेले होते. उत्तर प्रदेशातून ते लोकसभेवर गेले आणि राज्यमंत्री झाले.स्वत:च्या राज्यात काम करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी मला दिली आहे. माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नसून, मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे, असे अरुप पटनायक म्हणाले. मात्र ओडिशामधून त्यांना लोकसभेवर पाठवण्याचा बीजेडीचा विचार सुरू असल्याचे कळते. त्यांना ओडिशा विधानसभेवर पाठवण्याचा विचारही पक्षात होऊ शकेल. निवृत्तीनंतर आपण सामाजिक कार्य करणार असल्याचे त्यांनी जाहीरच केले होते आणि त्यानुसार कर्करोग पीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थेत ते सक्रिय होते. (वृत्तसंस्था)मुंबई स्फोट खटल्यात पकडले होते आरडीएक्सअरुप पटनायक १९७९च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी मुंबई पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांच्या तपासाच्या कामात ते सहभागी होते. त्या वेळी त्यांच्यामुळे प्रचंड प्रमाणातील आरडीएक्स पकडणे शक्य झाले होते. त्याआधी मुंबईतील दंगली आटोक्यात आणणे व तपासातही ते सहभागी होते. तसेच हर्षद मेहताने केलेल्या घोटाळ्याच्या तपासात त्यांचा मोठा वाटा होता. पटनायक ३० सप्टेंबर २०१५ रोजी पोलीस दलातून निवृत्त झाले.

टॅग्स :राजकारण