Join us  

रेमडेसिविरची २५ हजाराला विक्री करणाऱ्या दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:05 AM

गुन्हे शाखेची कारवाई; ५ इंजेक्शन जप्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या ...

गुन्हे शाखेची कारवाई; ५ इंजेक्शन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी दादर परिसरात बनावट ग्राहक पाठवून केलेल्या या कारवाईत ५ रेमडेसिविर जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेली दुकली प्रत्येकी २५ हजार रुपयाला याची विक्री करत होते.

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रुग्णांंच्या नातेवाईकांना २५ हजार रुपये घेऊन इंजेक्शन विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-५ ला मिळाली हाेती. त्यानुसार गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून आरोपीसोबत संपर्क साधला. आरोपीने प्रत्येकी २५ हजार रुपयात ५ इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी इंजेक्शन गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून ५ इंजेक्शनही जप्त करण्यात आली. अटक दुकलीविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.

....................................................................................