Join us

नांदगावकरांच्या नावे खंडणी मागणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:15 IST

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या दुकलीला सातारा येथून सोमवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या दुकलीला सातारा येथून सोमवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूरज निकम आणि रोहित कांबळे असे अटक करण्यात आलेल्या दुकलीचे नाव असून, त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

................................

तरुणीकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्याला अटक

मुंबई : कांदिवलीत एका बसथांब्यावर थांबलेल्या तरुणीला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. विजय फतलानी असे अटक करण्यात आलेल्या विकृताचे नाव असून तो भाईंदरचा रहिवासी आहे.

.........................

तरुणीला फेसबुक मैत्री पडली महागात

मुंबई : जोगेश्वरीतील एका २२ वर्षीय तरुणीला फेसबुक मैत्री महागात पडली आहे. फेसबुक मित्राने पार्टीला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

................................