Join us  

करी रोड पुलासाठी लष्कर सज्ज, रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक, दादर-सीएसएमटी रेल्वे ६ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:47 AM

ष्करामार्फत उभारण्यात येणा-या ३ पुलांपैकी शेवटचा पूल करी रोड स्थानकात रविवारी उभारण्यात येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी लष्कर सज्ज झाले असून, पुलासाठी मध्य रेल्वेनेदेखील विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ६ ते ८ तासांपर्यंतचा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे.

मुंबई - लष्करामार्फत उभारण्यात येणा-या ३ पुलांपैकी शेवटचा पूल करी रोड स्थानकात रविवारी उभारण्यात येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी लष्कर सज्ज झाले असून, पुलासाठी मध्य रेल्वेनेदेखील विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ६ ते ८ तासांपर्यंतचा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. या काळात दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद असणार आहे.लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारण्यात आला. आंबविली पुलाचे काम पूर्ण झाले असून, एल्फिन्स्टन-परळ पुलाची उभारणी झाली आहे. करी रोड येथील पुलासाठी रविवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत (८ तास) अप जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे, तर सकाळी ९ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत (६ तास) डाउन आणि अप जलद मार्गांसह डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी-दादर धिम्या आणि जलद मार्गावरील दोन्ही दिशेकडील लोकल फेºया रद्द ठेवण्यात येणार आहेत.ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस फेºयांवरदेखील परिणाम होणार आहे. शनिवारी धावणाºया सह्याद्री एक्स्प्रेस आणि सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी धावणाºया सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. हावडा-सीएसएमटी ठाणे स्थानकापर्यंत, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत आणि वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.ब्लॉकच्या आधी...- शेवटची लोकल अप फास्ट मार्गावर दादरहून सकाळी ८.१२ वाजता सुटेल.- शेवटची लोकल अप स्लो मार्गावर दादरहून सकाळी ९.०० वाजता सुटेल.- शेवटची लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहून सकाळी ९.०५ वाजता सुटेल.- शेवटची लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहून सकाळी ९.१२ वाजता सुटेल.ब्लॉकच्या नंतर...- पहिली लोकल अप स्लो मार्गावर दादरहून दुपारी ३.३५ वाजता सुटेल.- पहिली लोकल अप फास्ट मार्गावर दादरहून दुपारी ४.३८ वाजता सुटेल.-पहिली लोकल डाउन फास्ट मार्गावर सीएसएमटीहून दुपारी ३.४० वाजता सुटेल.- पहिली लोकल डाउन स्लो मार्गावर सीएसएमटीहून दुपारी ३.५० वाजता सुटेल.फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात होणार उद्घाटनकरी रोड पुलासाठी ३५० टन क्षमता असलेली क्रेन आणण्यात येणार आहे. करी रोड लष्करी पादचारी पूल ३० मीटर लांब असून, ३.७५ मीटर रुंद असणार आहे. या पुलाच्या उभारणीनंतर पुलाचे छत आणि पायºया जोडणीच्या कामासाठी सुमारे १५ दिवसांचा काळ लागणार आहे. सद्य:स्थितीत आंबिवली पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले असून,एल्फिन्स्टन-परळ पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तिन्ही पुलांचे उद्घाटन एकत्रित होणार असल्याने, साधारणपणे फेबु्रवारीच्या तिसºया आठवड्यात हे पूल प्रवाशांसाठी खुले होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :मुंबई लोकलभारतीय जवान