Join us  

भरतीवेळी ‘हाजीअली’ दर्शन टाळावे, पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:23 AM

मुंबईत रमजान ईदनिमित्ताने हाजीअली दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याच काळात समुद्रामध्ये भरतीच्या लाटा उसळणार असल्याने हाजी अली दर्गा येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई  - मुंबईत रमजान ईदनिमित्ताने हाजीअली दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याच काळात समुद्रामध्ये भरतीच्या लाटा उसळणार असल्याने हाजी अली दर्गा येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भरतीच्या वेळी रमजान ईदपासून पुढील तीन दिवस येथील प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी या वेळेत दर्शनासाठी येणे टाळावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.ईदसाठी मशिदी, दर्गा तसेच बाजारपेठांमध्ये पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बल जागोजागी तैनात असणार आहे. तसेच राज्य दहशतवादविरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्सच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.अशात मुंबईत रमजान ईदनिमित्ताने हाजीअली दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. समुद्रात भरतीच्या वेळी हाजीअली किनारा मशीद ते हाजीअली दर्गापर्यंतच्या मार्गावर समुद्राच्या लाटा उसळतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रमजान ईद, बाशी ईद, तेरशी ईदसह १९ जूनपर्यंत भरतीच्या वेळी हाजीअली दर्गा येथील प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी या वेळेत दर्शनासाठी येणे टाळावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या