जागरूक नागरिकाकडून गर्दी न करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:09 AM2019-07-17T06:09:05+5:302019-07-17T06:09:31+5:30

इमारत कोसळण्याची घटना झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण वाढले.

Appeal for not being crowded by a citizen | जागरूक नागरिकाकडून गर्दी न करण्याचे आवाहन

जागरूक नागरिकाकडून गर्दी न करण्याचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : इमारत कोसळण्याची घटना झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण वाढले. त्यानंतर, गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि स्थानिक नागरिक सज्ज झाले. घटना झालेल्या ठिकाणांपासून ते मुख्य रस्त्यापर्यंत परिसरात गर्दीचे प्रमाण वाढले होते.
ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी दोरी लावून गर्दी हटविली, तर एक जागरूक नागरिक माइक आणि स्पीकर घेऊन गर्दी न करण्याचे आवाहन प्रत्येकाला करत होता. मोहम्मद फारूक कुरेशी (५७) यांनी हातात माइक आणि स्पीकर घेऊन गर्दी करणाऱ्या नागरिकांना हटवित होता. घटनास्थळापासून इतर नागरिकांना हटवित होता. कुरेशी यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी नियंत्रणात आली. आपत्कालीन पथकाला गर्दीची समस्या होऊ
नये, यासाठी गर्दीचे नियंत्रण करत असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

Web Title: Appeal for not being crowded by a citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.