राज ठाकरेंना लटकवले, भाजपाचे मनसे अध्यक्षांना 'कार्टुनस्टाईल उत्तर'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 02:57 PM2019-01-26T14:57:21+5:302019-01-26T15:07:27+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

Answer to Raj Thackeray's cartoon, BJP's reply to the cartoon of MNS chief in republic day | राज ठाकरेंना लटकवले, भाजपाचे मनसे अध्यक्षांना 'कार्टुनस्टाईल उत्तर'

राज ठाकरेंना लटकवले, भाजपाचे मनसे अध्यक्षांना 'कार्टुनस्टाईल उत्तर'

googlenewsNext

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'स्वतंत्रते न बघवते' या व्यंगचित्राला भाजपानेही त्याचस्टाईलने उत्तर दिले. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला उत्तर देताना भाजपा समर्थकाने 'अच्छे दिन न बघवीते' असे शिर्षक दिले आहे. तर, या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनाच फासावर लटकविण्यात आले असून त्याची दोर मोदींच्या हातात दर्शवली आहे. मोदींसोबत बाजुलाच अमित शहा हेही आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यंगचित्र साकारताना राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. मोदी यांनी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली होती. राज यांचे हे व्यंगचित्र काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच भाजप समर्थकांनी राज यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप घेत, भारतमातेचा अपमान केल्याचंही म्हटलं. त्यानंतर, काही तासांतच भाजपा समर्थकांनीही व्यंगचित्राच्या माध्यमातूनच राज ठाकरेंना लक्ष्य केलं. भाजप समर्थकांनी काढलेल्या चित्रात नोटबंदीमुळे राज ठाकरेंचा मोदींवर राग असल्याचं म्हटलंय. या व्यंगचित्रात मोदींच्या हातात दोर दिसत असून राज यांना फासावर लटकविण्यात आले आहे. तर, राज यांना अच्छे दिन दिसत नसल्याची टीका केली आहे. तसेच मोदींचे हात बळकट करा, असेही या चित्रासोबत लिहिले आहे. 

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे बोचरी टीका
'स्वतंत्रते न बघवते', असे शीर्षक राज ठाकरे यांनी व्यंगचित्राला दिले आहे. पंतप्रधान मोदी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवत आहेत आणि मोदींचे हात बळकट करा, असे म्हणत अमित शहा त्यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. पण, या व्यंगचित्रामुळे काही नेटीझन्स राज ठाकरेंवर संतापले. काहींनी आपला संताप थेट व्यक्तदेखील केला आहे.  
 

Web Title: Answer to Raj Thackeray's cartoon, BJP's reply to the cartoon of MNS chief in republic day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.