Join us

मुंबईत काेराेनाचे आणखी १७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST

मुंबई : मुंबईत शुक्रवारी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, १ हजार ७४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३१३ कोरोना ...

मुंबई : मुंबईत शुक्रवारी १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, १ हजार ७४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३१३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण काेराेनाबाधितांची संख्या २ लाख ८० हजार ८११ आहे. आतापर्यंत २ लाख ५४ हजार ४६५ रुग्ण बरे झाले, तर १२,०५८ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण मृतांचा आकडा १०,७५३ असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. रुग्णदुपटीचा काळ १९५ दिवस आहे.