Join us  

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या आनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या आनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, प्रमाणपत्रे सादर करण्यास दिलेल्या अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जारी करण्यात आले आहे. हे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाअवर उपलब्ध आहे.

* असे आहे सुधारित वेळापत्रक

१४ ते २० जानेवारी २०२१ - पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे.

- २१ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

- २१ ते २३ जानेवारी २०२१- कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे.

- २५ जानेवारी २०२१ - दुसऱ्या कॅप फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे - २६ ते ३० जानेवारी २०२१

सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफ तारिक - ५ फेब्रुवारी २०२१

.....

बी.फार्म/डी.फार्मसाठी सुधारित वेळापत्रक

पहिल्या कॅप फेरीमधील जागा स्वीकारणे आणि प्रवेश घेणे-१२ ते २० जानेवारी २०२१

दुसऱ्या कॅप फेरीसाठी रिक्त जगाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे - २१ जानेवारी २०२१

कॅप फेरी २ साठी ऑप्शन फॉर्म भरणे-२१ ते २२ जानेवारी २०२१

दुसऱ्या कॅप फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे-२५ जानेवारी २०२१

दुसऱ्या कॅप फेरीतील जागा स्वीकारणे आणि प्रवेश निश्चिती करणे-२७ ते २९ जानेवारी २०२१

सर्व प्रकारच्या प्रवेशांसाठी कट ऑफ तारिक-५ फेब्रुवारी २०२१